ग्वांग्ज्झाउ म्हणजे पूर्वीचे कॅन्ट्न, ग्वांगडाँग प्रांत, दक्षिण चीन. जवळच फोशान येथे आमचे मित्रवर्य मनोगती संदिप लेले असतात.

हंगज्झाउ हे झेज्यांग प्रांत, दक्षिण पूर्व चीन येथे आहे. हंगज्झाउ येथे 'वेस्ट लेक' हे अप्रतिम सरोवर आहे. स्थानिक लोक त्याला भूतलावरील स्वर्ग म्हणतात. इथला सूर्यास्त पाहण्यासारखा आहे असे म्हणतात. मात्र काम संपवून पोचेपर्यंत आम्हाला तो अस्ताला गेल्यावरच पाहता आला. चौथ्यांदा जरा लवकर गेलो पण हवा ढगाळ असल्याने सूर्यनारायण दिसले नाहीत. आता पुन्हा जातो आहे पुढच्या आठवड्यात पण यावेळी वेस्ट लेक वर जायला वेळ होणे शक्यच नाही.

मात्र हे शहर व लगतचे श्याओशान शहर हे नितांतसुंदर आहे. इथला उलाँग चहा अतिशय प्रसिद्ध आहे.