वात्रटिका धमाल आहे हो. ते लिहायचे राहून गेले. मुळात तुमच्या कवितेकडे मी वैद्यबुवांच्या 'टॉप टेन' कडून दुवा पकडून आलो. त्यामुळे तिकडे लिहिलेला प्रतिसाद इकडे वळविला आणि तिकडे दुवा दिला. पण त्यामुळे वात्रटिकेबद्दल लिहिलेच नाही.
आणि तुम्ही उल्लेख केलेले संख्याशास्त्रज्ञांची नावे पाहून तुम्ही स्वतः कुठेतरी संख्याशास्त्राशी संबंधित असणार याची खात्री होती.
आणखी एक लिखाणाचा नूर पाहून 'बदनामी' वगैरे राग लटका आहे असे समजेल असे वाटले (नाहीतरी आमच्या लेखनक्षमतेबद्दल आम्हाला फाजिल आत्मविश्वास आहे) म्हणून 'ह. घ्या.' लिहिले नाही. आणि संख्याशास्त्रीय विनोदांचे म्हणाल तर आम्ही स्वतःच अनेक विनोद पसरवत असतो. परंतु विनोद हा विनोद आहे हे समजावे - ती शास्त्राच्या अनुपयुक्ततेची सिद्धता नव्हे - ह्यासाठी तपशीलवार खुलासा केला.
-विचक्षण