काही प̮. ल कोट्या

'पुणे' नगरी ही अनेक चळवळींची 'रोपवाटिका' आहे. तशीच 'आरोपवाटिका'हि आहे. (चू.भू.द्या. घ्या)
पु. ल. ना अनेक उपकऱणे (गॅजेटस्) कशी वापरायची ते माहित नव्हते. त्यामुळे ते स्वतःला 'नॉन-गॅजेटेड' समजत!
एका ऊस-साख्रर कारखानदाराला त्याच्या राजकीय पक्षाने निवडणुकीत 'तिकिट' नाकारल्याने त्याने केलेल्या आरडाओरड्याला पु. ल 'गळिताचा हंगामा' म्हणतात.
सं. सौभद्रच्या प्रयोगात कृष्णाचे काम करणारा नट कृश व म्हातारा होता. ते बेंगरूळ ध्यान पाहून पु. ल म्हणाले ' कृष्णाला 'अवतार' का म्हणतात हे आज मला कळलं'.

एका उपहारगृहावरची  पाटीः
आमचे येथे सर्व प्रकारचे 'चाट' व इतर अचाट पदार्थ मिळतील.
काही माझ्या
खाद्य-पदार्थ म्हणजे 'चरब्रह्म'

जयन्ता५२