प्रकटन छान.
या प्रकटनात व्यसनांचे समर्थन नाही. काय चांगले-काय वाईट याचा न्यायनिवाडा नाही. हे एक सरळसोट आयुष्य जगणाऱ्या माणसाचे चित्र आहे, ज्याला आपण जगलो म्हणजे नक्की काय केले हे सांगता येत नाही. असे सरळ जगून आपल्या जगण्याचे सार सांगता येत असेल तर अजून काय पाहिजे?
ज्याला ते जमते त्याने जरूर करावे!
तसेच आपण केलेल्या खुलाशामुळे अजून बरे वाटले. कारण 'इतर' गोष्टी करणाऱ्या अनेकांना ते तसे का करतात हे माहीत नसते. त्यामुळे त्यांचे आयुष्यसुद्धा माझ्यामते असेच 'सपाट' असते. तथाकथीत 'कलंदर' वागणारे सर्वच कुठे कलंदर असतात? बरेच दरवेशामागे ओढ्ल्या जाणाऱ्या अस्वलासारखेच त्यांच्या 'गरजांमागे' ओढले जात असतात. शेवटी काय सार सांगता आले पाहीजे..म्हणजे सार काय हे सांगता न आले तरी निदान माहीत तरी असले पाहीजे. ज्याला ते जमते त्याने जरूर करावे!
--लिखाळ.