आधीच्या आढाव्यापासून या क्षणापर्यंत परिस्थितीत फारसा नाही पण किंचित फरक जरूर पडला आहे. झालेली अडीच पक्षांतरे मांडतो आहे.
(१) साती - या चर्चेसाठी कंपूबाजीची गृहित धरलेली व्याख्या विचारात घेता साती कंपूबाजी करणाऱ्या गटात नाही. सहविचार आणि आवडीनिवडीनिसार सहज एकत्र येणे आणि रमणे इतक्याच अर्थाने कंपूत असणे म्हटले होते.
अर्थात कंपूबाज म्हणवून घेतल्याने काहीही फरक पडत नाही हे ही त्यांनी कळविले आहेच. तरीही चर्चेच्या संदर्भात चुकीची माहिती सर्वांसमोर मांडली जाऊ नये यासाठी सातींच्या परवानगीने "कंपूबाज" अशी सातींची नोंद हटवितो आहे.
(२) माझे (एकलव्याचे) येथे कंपूबाजी नाहीच हे ठाम थोडे डळमळीत झाले आहे. त्यामुळे ते १/२ मत कंपूबाजी कदाचित असावी यास देतो आहे.
(३) टग्यादादांनी दिलेल्या उत्तरांची सांगड मला नीट घालता न आल्याने त्यांचे नाव "मी कंपूबाज" असे टाकले नव्हते. ती दुरुस्ती करतो आहे.
(त्यामुळे कदाचित काही दाव्यांनुसार हे खरे तर दीडच पक्षांतर! पण येथे केवळ आधीच्या माझ्या आढाव्याशी संदर्भ ठेवल्याने अडीच मतांतरे अशी नोंद केलेली आहे.)
असो - तर पुन्हा आकडेवारी (आणि म्हणायचे असेल तर म्हणा धूळफेकही!!)
मते मांडणारे मनोगती - २४;
मनोगतावर कंपूबाजी आहे असे सांगणारी मते - १८.५; (~ ७७%)
स्वतः कंपूत असण्याची कबुली देणारी मते - २ (८.३३%)