या सर्व प्रकारांनी शरीराच्या विविध भागांना व्यायाम होतो हे १००% मान्य. पण बारा महिन्यातला फक्त एक महिना, तेही फक्त ४-५ मंगळवार (म्हणजेच ३६५ दिवसातले १.३७% दिवस) असे व्यायाम करून फार मदत होईल असे वाटत नाही. वर्षभरातल्या प्रत्येक मंगळवारी (३६५ दिवसातले १४.२४% दिवस) असे व्यायाम केले तर कदाचित फरक पडेल किंवा फायदा होईल असे वाटते.
कुठल्याही व्यायामाचा शरीराला फायदा होण्यासाठी आठवड्यातून किमान तीन ते कमाल पाच दिवस व्यायाम करावयास हवा असे सांगतात. म्हणजेच ३६५ दिवसातले ४२.७४ ते ७१.२३% दिवस.