उत्तम प्रतिसादांबद्दल धन्यवाद! वैद्यंनी केलेले खालील विधान छान वाटले.
इतर संस्कृतीचं शिंपडण आपल्यावर झालं तर थंड पाण्यानी आंघोळ करण्यापेक्षा त्या पाण्याचा सुगंध मनात भिनू द्यावा. फुफ्फुसांत आपल्या संस्कृतीची हवा असेल तर ती त्या दुसऱ्या हवेला नक्कीच मिसळून घेईल
आणि हो, मनोगत वर शुद्धलेखन तपासायची सोय आहे हे मी अत्ता बघितलं, तेंव्हा पुढच्या लेखांत त्याचा वापर करीन. बाकी माझ्या अशुद्धलेखनाबद्दल क्षमस्व! दाखवून दिल्याबद्दल विश्वमोहिनींचे आभार.