मराठी-हिंदीची बरीचशी गम्मत ही नको तिथे नको तो प्रत्यय लावल्याने होते असं मला वाटतं. आता हेच बघा ना.
त्याचं = उसका, कोंबडीचं = मुर्गीका, गाडीचं = गाडीका
म्हणूनच ...
जायचं = जानेका, आणि करायचं = करनेका!
किंवा
त्याला = उसको, कोंबडीला = मुर्गीको, गाडीला = गाडीको
म्हणूनच ...
जायला = जानेको, आणि करायला = करनेको!
पैले पानी पिनेका, फिर हात धुनेको जानेका! शिंपल!
- कोंबडी