माझा एक पुण्यातला सहकारी आमच्या दिल्लीतल्या कचेरीत गेला होता. तो ज्याला भेटायला गेला होता तो अजून कचेरीत आला नव्हता. त्याच्या P.A. नी सांगितलं की साहेब अजून घरी आहेत. तर आपला पुणेकर पी. ए. ला म्हणाला -
"तो फिर मै उसको घरमे फोन मारू क्या?"
ह्यावर पी. ए. साहेब अत्यंत अजीजिने आणि हसु आवरत म्हणाले -
"साहाब, फोन मारते क्यूं हो? प्यार से फोन करिये !"