फारा वर्षांपूर्वी महाराष्ट्र टाईम्स मध्ये (किंवा कदाचित लोकसत्ता मध्ये असेल) मराठी आडनावांवर एक अतिशय सुंदर विश्लेषणात्मक लेख आला होता.   अनेक वर्गीकरणे, त्यांच्या विश्लेषणासहित दिली होती - उदा.

प्राणी इ. वरून - वाघ, लांडगे, कोल्हे, ढेकणे, झुरळे, वाघमारे इ.;

पक्ष्यांवरून - साळुंके, कावळे, पोपट इ.;

फळे-भाज्या - फणसे, पोफळे, आंबेकर, भेंडे

शरीर अवयव - डोळे, डोळस, डोईफोडे, डोईजडे, बावनकुले;

क्रियाधारित - झगडे, ढवळे,  गोडबोले, कुटे;

व्यंगाधारित - बोबडे, चकणे, तोतरे, काणे

रूप/रंग, - देखणे काळे, गोरे, सावळे

स्थळ - पुणेकर, नागपुरे;

व्यवसाय - न्हावी, कोळी

कुणाकडे त्या लेखाचा दुवा असेल का?

धन्यवाद!

- मोहन