आमच्या एका पंजाबी मैत्रिणीने या weekend ला बिर्याणी खायला येणार का असे विचारले. सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटले... माझी एक अस्सल मराठमोळी मैत्रीण तर एकदम खुशीत आमंत्रण घेती झाली -
"बिर्याणी खाने को तो मै इक टांग पे नाचते नाचते आउंगी"...
अख्ख्या पंजाबच्या तोंडाचे पाणी मिनिटभर सुकलेले! तर दुसऱ्या मिनिटाला महाराष्ट्रभर हास्याचा महापूर!!
असो... ही माझी मैत्रीणही सहकुटुंब अलीकडे मनोगताचा आस्वाद घेत असते असे ऐकून आहे...