छान. यातले सर्व झोपेचे प्रकार अनुभवले आहेत.
मला हल्ली रोज भेटणारी झोप म्हणजे दुपारी जेवणानंतर कामाचे जर्मन तांत्रिक डॉक्युमेंटेशन वाचताना आणि समजायचा निष्फळ प्रयत्न करताना अनावर होणारी झोप. भयंकर प्रभावी झोपेचा उपाय आहे. (संजोप रावांना हवा असल्यास मला संपर्क साधावा!!) दृक श्राव्य सादरीकरणात तर झोप येतेच येते. अभ्यासाचे पुस्तक (खास करुन भौतिक शास्त्राचे किंवा 'इलेक्ट्रोमॅग्नेटीक इंजिनीयरींग' चे) झोपून वाचणे हाही हमखास उपाय आहे. दोन पानांत झोप लागते.