प्रश्न-१ आपले पूर्वज (आजोबा आजी आणि त्या आधीचे) रोजच्या आहारात सध्या आपण सेवन करतो त्यापेक्षा जास्त साजूक तूप खात होते का? जास्त साखर खात होते का?
रोजच्या आहारात म्हणाल तर नव्हते/नसावेत. सणासुदीला, लग्नामुंजीत मात्र अगदी आडवा हात मारून.
हे उत्तर अगदी बरोबर आहे.
आणि त्याचा अर्थ असा होतो की आजकाल आपला आहार अर्करूप पदार्थांच्या समावेशाबाबत जास्त कललेला आहे. त्यांचा त्रास होत असलेला दिसत असेल
(हल्ली शाळेतील मुले लडदू होण्याचे प्रमाण वाढत आहे.)
तर इलाज करावा की नको?
प्रश्न-२ त्याकाळी आज माहीत असणारे अवनतीकारक रोग जसे की हृदयविकार, कर्करोग वगैरे अस्तित्वात नव्हते का?
होते. पण आपण अनभिज्ञ होतो असे वाटते.
हेही उत्तर अगदी खरे आहे.
जेव्हा मलेरिया डासांनी होतो हे माहीत नव्हते तेव्हा लोक
देवीच्या अवकृपेने इसम गेला असे समजत असत. डासांनी मलेरिया होतो
हे ज्ञान झाल्यावर आपल्याला सार्वजनिक स्वच्चतेचे महत्त्व पटले होते.
तद्वतच आज हृद्रोग, कर्करोग यांसारख्या अवनतीकारक रोगांची कारणे
जर निःसंदिग्धपणे समजून आलेली असतील तर त्या अनुषंगाने आपण
आपल्या राहणीत जरूर ते बदल करायला हवेत की नकोत?
तद्वत हे अवनतीकारक रोग आणि आपले राहणीमान यांचातील अन्योन्य संबंधही प्रकाशात आलेला नव्हता का?
आला नसावा असं वाटतं. तेव्हा या रोगांवर इतका खोलवर विचार झाला असेल असे वाटत नाही.
हेही उत्तर बरोबरच आहे. आपली अज्ञानाकडून ज्ञानाकडे जी अविरत
वाटचाल होत आहे त्याचेच ते प्रतीक आहे. आज जर असा अन्योन्य संबंध
वैद्यकीय दृष्टीने सिद्ध झालेला असेल तर आपण तो मानावा की नको?
प्रश्न-४ साजुक तूपात किती टक्के कोलेस्टेरॉल असते?
माहीत नाही.
तुमचे उत्तर प्रामाणिक आहे. खरे उत्तर हे आहे की
साजूक तूप म्हणजेच १०० टक्के संपृक्त मेद. म्हणजे
असे म्हणता येईल की शरीर, साजूक तुपाचे
१०० टक्के कोलेस्टेरॉल मध्ये रुपांतर करू शकते.
आता काही नवे प्रश्न!
१. हल्ली गोडधोड/तिखट आंबट सणासुदीलाच केवळ न होता रोजच होत आहे का?
२. दरमहा तुम्ही किती बटाटेवडे खाता?
३. बटाटा, साखर ह्या वस्तू न खाता तुम्ही वर्षातून एक तरी दिवस राहता का?
४. माणसाचे नैसर्गिक खाद्य काय आहे?