तूप गरम असतानाच दुसऱ्या पातेल्यात/काचेच्या सटात गाळून घ्यावे. ज्यात तूप बनविले असते ते पातेले तिरपे करून भिंतीला टेकून उभे करून ठेवावे. जमा झालेले तूप नंतर काढून घेता येते.
असे तूप काढून घेतल्यावर त्या पातेल्यात कपभर (तळ बुडेल इतपत) पाणी भरून ते गरम करावे. असे केल्याने उरलेले-सुरलेले तूप त्या पाण्यावर तरंगते. हे पाणी पोळ्यांचे पीठ भिजविण्यास वापरावे. पोळ्या चवदार होतात. अन्यथा पातेले थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवून द्यावे. पाण्यावर तरंगणारे तूप घट्ट झाले की वरचेवर काढून घ्यावे.
पातेल्यातील पाणी पोळ्यांसाठी वापरल्यावर किंवा फ्रीजमध्ये ठेवून तूप वेगळे केल्यावर, पाणी फेकून दिल्यावर, जी बेरी तळाला उरते ती ख्ररवडून काढावी आणि त्यात साखर मिसळून पोळी बरोबर किंवा नुसतीच खावी. छान लागते.