अत्यानंद रुची दाखवल्याखातर धन्यवाद!

कुठल्याही पॅथीनुसार साजुक तूप १०० टक्के संपृक्त मेदच असते.
आयुर्वेद तुपाचे इतर अनंत फायदे सांगतो. त्यासाठी डॉ.बालाजी तांबे ह्यांचासकाळच्या फॅमिली डॉक्टरमध्ये प्रसिद्ध झालेला तूप ह्या नावाचा अध्याय वाचा. मात्र साजुक तूप दिवसाकाठी जास्तीत जास्त किती खाणे आरोग्यास अपायकारक होणार नाही ह्या माझ्या प्रश्नाचे उतर मला अजूनही आयुर्वेदाचार्यांकडून मिळालेले नाही. ऍलोपॅथीत साजुक तूप संपूर्ण बंद करायला सांगतात. मला ते पूर्णतः पटले आहे. मात्र वरील लेखात म्हटल्याप्रमाणे साजुक तुपाचे फायदे मला पटलेले नाहीत.

आपण सात पिढ्यांना पुरेल एवढी कमाई करण्यासाठी आटापिटा करतो.

जन्म आणि मृत्यू मानवाधीन नाहीत.
दरम्यानचे आयुष्य मानवाधीन आहे.
ते आरोग्यपूर्ण आणि दीर्घ असावे,
आयुष्याच्या शेवटल्या क्षणापर्यंत आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण असावे,
तोपर्यंत आपण आपल्या पायांवर चालत असावे, बोलत, ऐकत, संवेदत असावे
ह्यासाठी आपण काय करतो?