एखाद्या गोष्टीचा अतिरेक करणे (चांगल्या अथवा वाईट ) योग्य नव्हे.
हे खरेच आहे. किंबहुना हृदयविकाराला 'अतिरेकाचा रोग' असेच म्हणतात.
तो साखर, तेल, तूप इत्यादिकांच्या अतिरेकानेच उद्भवतो.
व म्हणूनच इलाज करतांना काहीश्या अतिरेकी उपाययोजना कराव्याच लागतात.
तेही जर तुम्हाला विनाऔषध, विनाशस्त्रक्रिया उपाय करायचा असेल तर.
निष्कारण भिती ही वाईटच. प्रत्येक गोष्टीला दोन बाजु असतात... चांगली आणि वाईट.त्याप्रमाणे कोणताही पदार्थ हा चांगलाच आहे किंवा वाईटच आहे असे विधान सरसकटपणे करु शकत नाही. त्यातुन प्रत्येकाचे प्रकृतीमान वेगवेगळे असल्यामुळे त्या त्या व्यक्तिना काय मानवते काय नाही हे देखिल ठरवावे लागते. औषध एकच असले तरी रोग्याच्या प्रकृतीमानाप्रमाणे त्याला डोस द्यावा लागतो.
मी भीती बाळगा असे कुठेही सांगितलेले नाही. निर्भय वागा.
शिवाय, आपण लेखाचे शिर्षकाखालील श्रेयअव्हेर वाचलेला दिसत नाही.
तो वाचावा ही नम्र विनंती.