मनोगती मित्रांनो ,
विकिपीडिया बद्दल आपल्या मनमोकळ्या भावना व्यक्त केल्या जात आहेत त्यामुळे ,मनोगत वर विकिपीडिया बद्दल लिहिणे आणि त्या बद्दलच्या प्रतिक्रिया ,साधक बाधक चर्चेचा विकिपीडियास पुढे चालून फायदाच होणार.
विकिपीडियाचे मनःपूर्वक अभिनंदन..
-तात्या तुमच्या सोबत आम्ही पण अभिनंदन करण्यात सहभागी आहोत.
अरे वा! मराठी विकिपीडियाचा मनोगतावर अगदी रीतसर प्रचार आणि प्रसार सुरू आहे!
-हो तसा प्रयत्न निश्चित आहे.विकिपीडिया आम्हा सोयरी नोहे, आमुचे असे प्रेम फक्त आमुच्या मायबोली मराठी वरी,जिथे जिथे मराठी आणि मराठी माणसाचे भले तिथे तिथे आमंत्रण आम्ही मराठी बांधवांना नाही तर कुणाला द्यावे ?
आम्हीही कधीतरी विकीवर दोन शब्द लिहायची इच्छा बाळगून आहोत!
-विकीबद्दल आपण मनोगत वर लिहिलेल्या विचारांचे पण स्वागत आहे.विकिवर लिहिलेत तर दुधात साखर.
आणि अशा प्रचाराने विकिपीडियामध्ये काही पानांची भर होऊन त्यांचा (खऱ्या) आर्थिक नफा झाला तर उत्तम!
- 'आर्थिक नफा' कसा मिळवावा या बद्दल विकिपीडियास काही पानांची विनामोबदला भर घालून समस्त मराठी जनास उपकृत करता आले तर छान होईल
http://www.manogat.com/node/6943 इथे आमचा विकि प्रवास नोंदवत आहोत इतरांच्या विकि प्रवासा बद्दल माहिती करून घेणे आवडेल.
कळावे लोभ आहेच तो वृद्धिंगत व्हावा हि विनंती