पहिल्यांदाच कोणीतरी परदेशात जाऊन 'जरा हटके' असे काहीतरी केल्याचे ऐकल्यामुळे आनंद वाटला. तुमचे अभिनंदन ! कथन खरोखरच छान.
आमच्या घरी आम्ही मिरच्या, कोथंबीर, अननस, डबलबी, घोसाळी काढल्या आहेत. पण हल्ली खूपच दुर्लक्ष होते. नाही म्हणायला भरपूर फुलझाडे, कढीलिंब मात्र आहेत. कोथिंबीरीचा प्रयत्न केला होता पण चिमण्या शिल्लकच ठेवत नाहीत. मिरच्यांना फुले आली की मिरची येईपर्यंत रोज सकाळी न चुकता पाहिले जायचे. मजा यायची.