राज्यभाषा आणि लोकभाषा या दोन्हीबाजूने मराठीचा वापर वाढवण्याचे उपाय केले पाहिजेत.
त्यापैकी लोकभाषा म्हणून वाढविण्यासाठी कायदे/नियम करता येणे शक्य नाही. त्यासाठी मराठी जनतेला अस्मिता आणि मराठीचे प्रेम असायला पाहिजे. त्याला सर्व समाज एकत्र आणून लहानपणापासून सर्वांनी जाणीवपूर्वक आचरण केले पाहिजे.
राज्यभाषा म्हणजे सरकारी पातळीवर व्यवहार/कामकाज करणे हे मात्र कायदे/नियम योग्य रितीने मंजूर करूनच करता येईल. असे नियम कटाक्षाने अमलात आणले पाहिजेत.
सहमत.