संजोपराव म्हणतात तसे हे व्यसनाचे समर्थन नसेलही. मात्र स्वतःला विज्ञानवादी म्हणवणाऱ्याला व्यसने असावीत (संदर्भः माझिया जातीचे) हे खटकले. विज्ञानवाद्याला व्यसनांचे दुष्परिणाम माहीत नसणे अशक्य वाटते, आणि तरीही तो व्यसन करत असेल तर स्वतःला बुद्धिवादी/विज्ञानवादी म्हणवून घेण्याचे धाडस कसे काय होते समजत नाही. की ही विज्ञाननिष्ठता केवळ देवाला अमान्य करण्यापुरतीच? सरसकट सर्व व्यसनाधीनांचे नाही तरी स्वतःच्या व्यसनाधीन जगण्याचे अप्रत्यक्ष समर्थन करणाऱ्याने केलेली ही कविता विनोदी आहे खरी.