स्कॉच, सिग्रेट, मटण या सर्वसंमत, कदाचित उथळ पण प्रातिनिधिक आनंदाच्या कल्पना आहेत.
-- या प्रातिनिधिक आनंदाच्या कल्पना कुणाच्या कल्पनांचे प्रतिनिधित्व करतात?

माझे लेखन हे माझ्या अनुभवावर आधारित असणे स्वाभाविक आहे त्यामुळे हा उल्लेख. त्यांचे जीवन सार्थ आहे का हे मी कसे ठरवणार?
-- पण ते रुक्ष,मिळमिळीत असते असे ठरवून टाकलेत!

मला वाटते मूळ सल इथे, 'विवेक' च्या उल्लेखात आहे.
-- हो, इथे मूळ वेदना 'विवेक' च्या उल्लेखातच आहे व त्या वेदनेमुळे एवढ्या तीव्रतेने, पोटतिडकीने लिहले आहे.

चार लोकांना कविता आवडल्याचे समाधान कुणी अकारण (दोनदा) व्यथित झाल्याने केंव्हाच संपले आहे. 'माझ्या बाजूने वाद संपवत आहे' अशा विधानाचे बाकी वेगळे अर्थ निघतात म्हणून मी ही चर्चा माझ्या बाजूने खुली ठेवत आहे.
-- पण मी मात्र संपवत आहे मग त्याचे अर्थ काहीही निघोत.

( हा वाद संजोपच्या ह्या कवितेपुरता होता. संजोपरावांच्या पुढील लिखाणाबद्दलच्या प्रतिसादावर या वादाची सावली निदान माझ्याकडून तरी पडणार नाही.)

जयन्ता५२