अहो विज्ञानवादी असण्याचा आणि व्यसनाचा काय संबंध?  शिकलेल्या ज्ञानाचा माणसाने वापर करावा की नाही, केल्यास किती मर्यादेपर्यंत करावा हे प्रत्येकाचे स्वतःचे निर्णय असतात. नाहीतर तर सुज्ञांचा म्हणविणारा देश  'गणपती दूध पितो' या वार्तेने वेड्यासारखा धावला नसता. (हा फक्त मुद्दा आहे सन्जोपराव, तुमच्यावरील टीका नाही). आणि दुष्परिणाम माहित असल्याचे म्हणाल तर अशा अनेक गोष्टी आपण करतो की ज्याचे दुष्परिणाम वा विफलता आपल्याला आधीच माहीत असतात.  लोक ऋण काढून सण साजरे करीत नाहीत का, चारचाकी गाडीच्या वेडापायी कर्ज काढून हौस भागवत नाहीत का? त्यात आपली आर्थिक कुवत आपल्याला कळत नाही का? त्याचे परिणाम म्हणून पुढे किती आर्थिक त्रास होतो हे कळत नसते का? आता इथे व्यसने ही अनैतिक असतात वगैरे मुद्दे कृपा करून काढू नका. त्यातून आणखी वेगळे मुद्दे निघतील ज्यांची चर्चा इथे अस्थानी ठरेल.

'स्वतःच्या व्यसनाधीन जगण्याचे अप्रत्यक्ष समर्थन करणाऱ्याने केलेली ही कविता...'

मला वाटते इथे सन्जोपरावांवरील टीका फारच वैयक्तिक झाली आहे. ते व्यसनी आहेत की नाही यावर तुम्ही भाष्य करणे पूर्णपणे अप्रासंगिक आणि मर्यादेचे उल्लंघन करणारे आहे म्हणूनच निषेधपात्र आहे. मुळात "व्यसनाधीन" हा फार टोकाचा शब्द आहे, तो अशा चर्चेत वापरणे बेजबाबदारपणाचे आहे

मनोगतावरील बऱ्याच प्रतिसादाप्रमाणे, मध्येच एक गैरलागू मुद्दा तुम्ही मांडला आहे. इथे 'देव न मानण्याचा' उल्लेख का आला? कवितेशी याचा काही संबंध आहे का? का याला कुठेतरी सन्जोपरावांनी (देव न मानण्याबद्दल) दिलेल्या प्रतिसादाचा संदर्भ आहे?

-(विज्ञानवादी) विचक्षण