आपला उपक्रम फारच चांगला आहे.
संपूर्ण राष्ट्राची सुस्पष्ट कल्पना डोळ्यासमोर नसल्यामूळेच समाज छिन्न-विछिन्न झाला आणि स्वार्थ भावना एवढी प्रबळ झाली की व्यक्ती आणि व्यक्तिचा परिवार याउपरची व्यापक दृष्टीने विचार करण्याची प्रवृत्ती नष्ट झाली. यामूळे आपल्याच श्रद्धास्थानांवर आणि लोकांवर आपल्यातीलच मंडळी प्रहार करण्यास प्रवृत्त झाली.
अधोरेखीत वाक्य, आजच्या परिस्थितीचे फारच योग्य निदान करते.
आपणच ही परिस्थिती ओढवून घेतली आहे. जगाच्या वेगाची योग्य जाण नसलेल्या पुराणमतवाद्यांचा आणि नवे पचवता येण्याची ताकद नसताना नव्या गोष्टींना अचानक सामोरे गेलेल्या तथाकथीत विचारवंतांचा यामध्ये फारच मोठा वाटा आहे.
-- (अल्पमती) लिखाळ.