नमस्कार,

मुळात ज्यूंच्या मूळ भूमीमधून अनेक शतकांपूर्वी पलायन करायला लागल्यानंतर भारतात आसरा घेतलेल्या ज्यू लोकांनाच बेने इस्राइली म्हणतात. त्यांच्यापैकी बहुतांश लोक हे महाराष्ट्रातच सापडतात आणि त्यांची नावे/आडनावेही मराठीच आहेत. ते मराठी संस्कृतीत निश्चितपणे मिसळून गेले आहेत. इतके की त्यांच्या मराठी बोलण्यावरून त्यांचे पूर्वज कधी तरी परक्या भूमीवरून भारतात आले हे बिलकूल समज़त नाही.

पण आता त्यांच्यापैकी पुढच्या पिढ्या इस्राइलला परतत आहेत, आणि इस्राइली सरकारच्या सर्व ज्यूंना सामावून घेण्याच्या धोरणाचा लाभ घेत आहेत. तिथे गेलेल्या बेने इस्राइलींना आपली निराळी मराठी ओळख टिकवणे हाही एक प्रश्न ज़ाणवत आहे. म्हणजे अमेरिकादी देशांतील अन्य मराठी बांधवांप्रमाणेच.

आपला,

मराठा