फाळणी

फाळणीची गरज आहे असे वाटत नाही. तसेच या शब्दाबद्दल माझ्या मनात तीव्र नापसंती आहे.

===

पुनर्रचना

आपण उपस्थित केलेले पाचही मुद्दे पटण्यासारखे आहेत. पुनर्रचनेची गरज आहे याबद्दल सहमत. ती पुनर्रचना कशी असावी याबद्दलची मते वेगवेगळी असू शकतात.

पुनर्रचना हवी आहे हे निश्चित. पण ती कशी आणि कुठे?

तुमच्या मुद्दा क्र.४ मध्ये इतर मुद्द्यांची-प्रश्नांची उत्तरे दडली आहेत असे वाटते.

स्वातंत्र्यपूर्वकाळात नेत्यांच्या एका हाकेसरशी बहुतांश लोक परदेशी राज्यकर्त्यांविरुद्ध एकत्र येऊन लढा देत असत. पण स्वातंत्र्योत्तर काळात संपूर्ण/बहुतांश देशाला अशी एक दमदार हाक देणारा नेता लाभला नाही असे वाटते. हेच लोकशाहीचे यश आणि अपयश आहे असे वाटते.

नादान, मूर्ख आणि संधिसाधू नेते राज्य करत आहेत. त्यांचे हे रूप पक्षनिरपेक्ष आहे असे वाटते. पण असे नेते राज्य करताहेत कारण आपण त्यांना ते करून देतो. अशा नेत्यांना लोकशाही मार्गाने हटवण्यासाठी जनसामान्यांची मानसिकता बदलायला हवी.

पुनर्रचना हवी आहे ती जनसामान्यांच्या मानसिकतेची. ही मानसिकता बदलण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे शिक्षण आहे असे वाटते. शिक्षणातून लोकांना धर्म, जात, लिंग आणि प्रादेशिकता यांच्या गुंत्यातून बाहेर काढण्यासाठी शिक्षणाव्यतिरिक्त दुसरा कोणता मार्ग माझ्या नजरेच्या टप्प्यात येत नाही.

लहान मुले म्हणजे चैतन्याचे पुंज असतात. त्यांच्या संस्कारक्षम वयातच त्यांच्यावर राष्ट्रीय एकात्मतेचे, समतेचे, देशप्रेमाचे संस्कार व्हायला हवेत. यात शिक्षणच मोठा हातभार लावू शकेल असे वाटते.

आणखी बरेच आहे, जसे सुचेल तसे लिहीन.