संशोधकांचे मनोगतवर स्वागत असो. तुमचा हा आणि इतर तीन प्रतिसाद वाचले. तुम्ही इतिहासाचे अभ्यासक दिसता.

पण तेथील लोकांनी मुसलमान आक्रमणाचा बंदोबस्त करून सक्तीने बाटवलेल्या गेलेल्या मुसलमानांना परत स्वधर्मात आणले.ते आपण केले नाही.पण आता स्पेनमध्ये मुसलमानांनी केलेल्या कत्तलींकडे तेथील लोक काणाडोळा करत नाहीत.ती चूक आपण केली आणि करत आहोत.

सहमत.

हिटलरमध्ये काही गुण निश्चितपणे होते. त्याशिवाय त्याचे नाव जगाच्या इतिहासात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये नक्कीच गणले गेले नसते.

सहमत.

मात्र अमेरिकेत रेड इंडियन्सच्या कत्तली झाल्या म्हणून हिटलरने कत्तली केल्या तर काय बिघडले असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष अथवा समर्थन करणे अयोग्य आहे असे मला वाटते.

सहमत.

===

रेड इंडियन्स आणि हिंदुकुश पर्वत यांमध्ये एक 'बादरायण' साम्य आहे.

१९व्या शतकात काही रेड इंडियन जमातींचे मिसिसिपी नदीच्या पूर्वेकडील राज्यातून नदीच्या पश्चिमेकडील भूभागात सक्तीचे पुनर्वसन करण्यात आले. अंदाजे २००० किमीचे अंतर या लोकांना पायी पार पाडावे लागले. या काळात रोगराईमुळे अनेकजण (अंदाजे ४००० ते ८०००) मृत्यूमुखी पडले. ज्या मार्गाने या लोकांना चालवत नेले तो मार्ग आज "अश्रूंची पायवाट (ट्रेल ऑफ टिअर्स)" या नावाने ओळखला जातो.

ईस्ट इंडियन्स आणि रेड इंडियन्स मध्ये आणखी एक साम्य!