दोन व्यक्तींमधल्या 'कम्युनिकेशनचे' 'भाषांतर' केले तर दळणवळण होऊ शकते, पण त्याच कृतीला जेंव्हा 'संवाद' म्हणले जाते तेव्हा ते रुपांतर/भावानुवाद होते असे वाटते.
===
आर के लक्ष्मण यांचा एक सचित्र विनोद आहे. त्यात मुलाखतीसाठी आलेला उमेदवार आपला सूट, कागतपत्रे इ सांभाळत, शाईत रंगाचा ब्रश बुडवून जमीनीवर खुर्चीचे चित्र काढतो आहे. आणि तो मुलाखतकार वैतागून कोणालातरी (कॉमन मॅनला?) सांगतो आहे "आय जस्ट आस्क्ड हिम टु ड्रॉ अ चेअर अँड सिट डाउन!"
या विनोदाचा इंग्लिशमधून संपूर्ण आस्वाद घेता येतो असे वाटते.
आता कल्पना करा की त्या उमेदवाराने प्रादेशिक भाषेत "ड्रॉ अ चेअर" चे भाषांतर केले तर तो काय करेल? आणि समजा भावानुवाद/रुपांतर केले तर काय करेल?
भाषांतर शब्दाचा/वाक्याचा संदर्भ बघेलच असे नाही. रुपांतर/भावानुवाद ते बघते असे वाटते.