अमेरिकेमध्ये (तसेच इतर बहुतेक पाश्चात्य देशात) गाईचे दूध काधतात तेव्हा साधारण ५-६% मलई (क्रीम) असते.  ती मलई घुसळून वेगळी केली जाते.  त्यापासून लोणी करतात.  तसेच नुसती मलई विकतात.  त्यास हेवी क्रीम आणि व्हिपिंग क्रीम असे म्हणतात.  तसे हे काढलेले क्रीम (फॅट) हवे त्या प्रमाणात ०%, १%, २% आणि ३.८% असे मिसळून ज्यांना हवे तसे मिळू शकते.   २०% फॅट असलेले तसेच हाफ & हाफ मिळते.

इथे तुम्हाला (ग्राहकाला) जे पाहिजे ते देण्याची भावना असते.  जर मागणी असेल तर ते पदार्थ मिळतील.

भारतात साधारण म्हशीचे दूध असते.  ते जर पाणी घालून भेसळ केली नसेल तर ७-७.५% मलईदार असते.  त्याची चवहि वेगळी असते.

अमेरिकेतल्या दुधाबद्दल भारतीयांमध्ये असलेले गैरसमज दूर व्हावे म्हणून ही माहिती देतो.  व्यं नि. द्वारे अधिक माहिती देऊ शकेन.

कलोअ,
सुभाष