अक्षरांचा लाल रंग थोडा तापट वाटत (लाल लिंबू सरबताचा असावा) असला तरी तुमचे मुद्दे जवळपास पटण्यासारखे आहेतच, असतातच.
संगीत गुरुमुखातून ऐकून शिकायला हवे. पण प्रत्येकाला हे गुरुमुख उपलब्ध होईल असे नाही. अशावेळी आणि ह्याशिवाय संगीतविषयक सखोल शास्त्रीय माहिती देणारे एखादे पुस्तक वाचल्यास हरकत काय?
मोज़ार्ट, बीतोवन आदींच्या सिंफ़न्यांची नोटेशने वाचूनच पाश्चात्य संगीतकार वादन, गायन करतात. आम्ही भारतीय संगीतात तसे काही केले तर काय बिघडले? गुरूचे महत्त्व कधीही कमी ने होणारे आहे. पण ग्रंथदेखील गुरूच ना.
ऋग्वेदाचे पठण कसे करायचे हे वेदपठण करणाऱ्याकडूनच शिकायला हवे. पण म्हणून काय ऋग्वेद वाचायचा नाही काय?
वाचनाच्या एकांतात गहन विचार करता येतो, हे खरे नाही काय?
असो.