मी स्वतः या प्रतिसाद चर्चेतून मागे हटल्यानंतरही ज्या उत्साहाने व अनपेक्षितपणे इतर मित्रांनी चर्चा पुढे नेली व बहुमूल्य माहिती दिली त्याबद्दल सर्वांचे, विशेषतः सुभाषरावांचे शतशः आभार.
लेखकाने स्वतः प्रतिसादाला प्रतिसाद न देता एवढे प्रतिसाद जमू शकतात असे माझ्या कल्पनेतही कधी आले नसते.
पुन्हा एकदा चित्तरंजन, मी आगाऊ, वरदाताई, भोमेकाका, शशांक, टगेराव, सुभाषचंद्र, विनायक यांना धन्यवाद.
मिलिन्दराव व तात्या यांची नावे वेगळी शिल्लक ठेवण्याचे कारण म्हणजे त्यांनीच तर भरपूर सहभाग घेऊन या रुक्ष लेखाला जिवंतपणा आणला, त्यांचे विशेष आभार.
खरोखर आपण सगळे निर्मळ मनाचे खळखळणारे निर्झर आहात आणि असेच निरंतर रहा.
(आपने अपना बनाया, मेहरबानी आपकी
हम तो इस क़ाबिल न थे, है क़द्रदानी आपकी)
दिगम्भा