राष्ट्रवादी नि काँग्रेस या दोघांचीही मतं फ़ुटण्याची एक शक्यता त्यांच्या बालेकिल्ल्यातच निर्माण झाली निर्माण झाली ही माझ्या दृष्टीने एक चांगली घटना.
आता याचा राजकीय फ़ायदा मिळणारे युतीचे वीरही काय दिवे लावणारेत [लावणार आहेत की नाही ... वा कदाचित युतीचे वीर म्हणायला युती राहतेय की नाही] देव जाणे!
रणवीर सेनेच्या उपमेबाबतः
चपखल उपमा आहे. ग्रामीण भागात सवर्णांशी एकेकट्याला गाठून हुंडा, जातपात, स्त्रीमुक्ती या विषयांवर काही बोलून पहा. तथाकथित सुशिक्षित, तरूण लोकही अशी मुक्ताफ़ळं उधळतील की स्वतःच्याच फ़ाडफ़ाड तोंडात मारून घ्यावेसे वाटेल. पुण्यामुंबईतही काही फ़ार वेगळेपणा आहे असं नाही. काही लोक भेटतात असे अधूनमधून; फ़ारतर भावनांची तीव्रता कमी असते.