हा कायदा भारतव्यापी होणार असल्याकारणे अण्णाची लढाई केंद्र शासनाविरुध्द होणार आहे.

परंतु त्याबाबतीत आवश्यक असलेली जनजागृती झालेली आहे काय याबद्दल मी साशंक आहे.

शेवटी जनजागृती व्हावी आणि त्याचा दबाव शासनावर यावा असा अण्णाचा उद्द्येश असावा.

उपोषणाची घोषणा करण्यात घाई झालेली असावी असे मला वाटते.

एक दोन दिवसात आळंदीला जाण्याचा विचार आहे. त्यावेळेस अजुन खुलासा होईल अशी अपेक्षा आहे.