हे सर्व ग्लोबल वॉर्मिंग मुळे घडत आहे हे नक्की. यंदा अमेरिकेतही आणि युरोपातही भयंकर उन्हाळा पडला आहे. २००३ मधील फ्रान्स मधील उन्हाळ्याला १५००० नागरिक बळी पडले होते. जागतिक तापमानात वाढ होत जाईल तसे पावसाचे प्रमाण वाढत जाईल. तसेच जंगले नष्ट होत गेल्याने अनियमितपणा येत जाईल. पूर वाढतील. कारण जंगले जमिनीची धूप थांबवतात.

सुनामी मानवनिर्मित नक्कीच नाही पण अतवृष्टी आणि चक्रीवादळांचे वाढते प्रमाण हे मानव निर्मित प्रदूषणाचेच भीषण परिणाम आहेत  यात संशय नाही.

अमरनाथ यात्रेत नैसर्गिक रित्या न बनू शकलेले बर्फाचे शिवलिंग हा ग्लोबल वॉर्मिंगचाच दृश्य परिणाम पण आपण हा धोका अजूनही  ओळखला नाहीये. 

शंकर म्हणजे काय हे वेगळे सांगत बसत नाही. पण शेवटी  शंकर हे निसर्गाचेच प्रतिकात्मक रूप आहे. निसर्गाने रौद्रावतार धारण केला असे आपण म्हणतो ते उगीच नाही. मानवाने स्वतःच्या हाताने पायावर धोंडा पाडून घ्यायचा आणि विनाशाची देवता म्हणून शंकराकडे बोट दाखवायचे याला काहीच अर्थ नाही.