झकास राव. तुम्ही एकदम सही माहिती दिली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या नव्या पर्यायातील धोकेही दिले आहेत. पवनऊर्जेच्या बाबत काय घडते आहे ते आपण पाहतोच आहोत.
बायोडिझेल निर्मितीचा आणखी एक संभाव्य परिणाम म्हणजे अन्नधान्य महागेल असा काही जणांचा आक्षेप आहे. जसे उसाचे झाले तसे जर इंधननिर्मितीस उपयुक्त पिकांचे झाले तर शेतकरी त्यामागे धावतील आणि अन्नधान्याच्या लागवडीखालील क्षेत्र कमी होईल अशी भीती व्यक्त केली जाते. तसेच साखरकारखान्यांप्रमाणे जर बायोडिझेलनिर्मिती जर मोठा व्यवसाय झाला तर (अधिक 'गाळप' क्षमता असल्याने) अन्य काही धान्यांचा वापर या निर्मितीसाठी करण्याचे प्रयत्न होतील. यातून अधिक मागणी व मर्यादित पुरवठा यामुळे काही धान्ये अधिक महाग होतील. मध्यंतरी असा एक लेख वाचण्यात आला होता (दुर्दैवाने कुठे ते आता आठवत नाही)
कुणास ठाऊक, तुम्ही म्हणता तशा 'ऑईल लॉबी'नेही अशा तथाकथित तज्ञांना या कामाला (बायोडिझेलचे दोष दाखवण्याच्या) लावले असेल. कारण यामार्गे बायोडिझेलची अव्यवहार्यता सिद्ध करणे त्यांच्या पथ्यावर पडणार आहे.
सौरऊर्जा हा आपल्यासारख्या 'उष्ण कटिबंधीय' देशांना उपलब्ध असलेला सर्वोत्तम पर्याय आहे. परंतु तो अजूनही खूप महाग आहे. त्यावर संशोधन करून खर्च कमी करण्याचा वा काही सुधारणा करण्याचा प्रयत्न आपण करीत नाही. गोरा साहेब संशोधन करेल व आपल्याला आयते मिळेल अशी आपली इच्छा असते. पण गोऱ्या साहेबाच्या देशात हा पर्याय फारसा उपयुक्त नसल्याने तेथे त्यावरील संशोधन प्राधान्यक्रमात खूपच खाली आहे. मग साहेब उदासीन तर आम्हीही उदासीन. दुर्दैवाने या किंवा अशा काही समस्या या (बायोडिझेल) पर्यायातही उद्भवल्या तर त्यावर उपाययोजना शोधणारे चांगले संशोधकही इथेच तयार व्हायला हवेत. ही सुद्धा एक महत्वाची गरज आहे असे आवर्जून नमूद करावेसे वाटते.
इथे पुनर्भरणाचा एक फायदा नोंदवला आहे. आपली संस्कृती बघता आपण याबाबत किती गंभीरपणे विचार करणार याचा तर्क आपण करू शकतो. बहुधा आयते ओरबाडणे होणार हे उघड आहे.
पाच हजार एकरात पन्नास लाख लिटर डिझेल हा हिशोब (खरा असेल तर) अतिशय उत्साहवर्धक आहे.
अधिक माहितीसाठी काही संकेतस्थळांचे पत्ते दिलेत तर बरे होईल.
-विचक्षण