हे सर्व ग्लोबल वॉर्मिंग मुळे घडत आहे हे नक्की. यंदा अमेरिकेतही आणि युरोपातही भयंकर उन्हाळा पडला आहे. २००३ मधील फ्रान्स मधील उन्हाळ्याला १५००० नागरिक बळी पडले होते. जागतिक तापमानात वाढ होत जाईल तसे पावसाचे प्रमाण वाढत जाईल. तसेच जंगले नष्ट होत गेल्याने अनियमितपणा येत जाईल. पूर वाढतील. कारण जंगले जमिनीची धूप थांबवतात.

सुनामी मानवनिर्मित नक्कीच नाही पण अतवृष्टी आणि चक्रीवादळांचे वाढते प्रमाण हे मानव निर्मित प्रदूषणाचेच भीषण परिणाम आहेत  यात संशय नाही.

---------------- बहुतांश सहमत. मात्र जागतिक तापमानवाढीमुळे पाऊस वाढेलच असे नाही. काही ठिकाणी कमीही होईल. IPCC(Intergovernmental Panel for Climate Change) च्या  वार्षिक अहवालांमध्ये जागतिक तापमानवाढीच्या जागतिक परिणामांबद्दल विस्तृत लिहिलेले आहे.