मुंबईत मिळणारे गोकुळ दूध खूपच दाट असते. त्याची साय काढली की तिच्यावर तूप दिसते. गोकुळ दुधाच्या सायीचा तूप करण्यासाठी प्रयोग करून पाहिला पाहिजे. सायीचे तूप करता आले तर बाकीचा सर्व व्याप वाचेल.

येथे एकदा मी great value बटरचे तूप करून पाहिले पण ते चवीला अजिबात चांगले नाही, असे का झाले असावे? की बटर मध्ये ही फरक असतो. land o lakes बटरच्या  तूपाची चव भारतात मिळणाऱ्या तूपाच्या चवीसारखीच असते.

लोणी कढवताना त्यात थोडे मीठ घातले तर कणीदार तूप बनते. बनवलेले तूप जर फ्रीजमध्ये ठेवले तर मात्र त्या तुपाची चवच निघून जाते.