आअअआभाआपले म्हणणे योग्य आहे. मनोगतावरील सुविधेत प्रत्येक कीस्ट्रोकसाठी संपूर्ण लिखाण परत परावर्तित होते. मी प्रत्येक कीस्ट्रोकसाठी एकास एक या प्रमाणे बदल करत आहे. ह्याप्रमाणे बदल करणे सद्ध्या तरी फक्त इंटरनेट एक्स्प्लोरर वरच शक्य आहे कारण इतर ब्राऊसर्स कीस्ट्रोक च्या किंमतीत बदल करू देत नाहीत.
तुम्ही केलेली 'ठ' ची सुचना अगदी योग्य आहे आणि तो बदल माझ्या विचारात आहे. पण त्यासाठी मी वापरत असलेल्या तंत्रात काही अडचणी येतात त्यावर अजून मला उपाय सापडलेला नाही.
जिथे लिहिता तेथे जे लिहाल तेच दिसायला हवे याकरता मी आयट्रान्स चा पर्याय टाळला. त्यात एका फलकावर रोमन लिपीत लिखाण होते आणि दुसऱ्या फलकावर इतर लिपीतला मजकूर दिसतो. पण आयट्रान्स च्या एनकोडिंगशी जवळीक साधण्याच प्रयत्न चालू आहे.
माझा प्रयत्न ट्युरींग मशीन च्या तत्वावर बेतलेला आहे. त्यानुसार आधीचा कीस्ट्रोक,आधीचा परिवर्तन संकेत, आत्ताचा कीस्ट्रोक यावरून नंतरचा परिवर्तन संकेत, दुसऱ्या लिपीतील वर्ण इ. ठरत जाते.
याशिवाय आपण एकाच फलकावर एकाच वेळी दिलेल्या लिप्यांची सरमिसळ करून सर्व लिप्यांचा मजकूर एकत्र साठवू शकता. हा पर्याय इतर प्रणाल्यांमध्ये आहे की नाही याबद्दल मला फारशी माहिती नाही.
सद्ध्या ही प्रणाली आणखी सुधारण करून ऍप्लेट अथवा ऍप्लिकेशन च्या स्वरूपात देण्याचा विचार चालू आहे.
आपल्या प्रतिसादाबद्द्ल आभार.