आमच्याकडे याच पद्धतीने तूप करतात. फार सुरेख, आणि रवाळ तूप होते.
वा तात्या. छानच.
गोकुळ दुध घालून चहा पण अप्रतिम लागतो. चहात गोकुळ दूध अगदी थोडे घातले तरी दाट चहा होतो. इथे आल्यापासून असा दाट चहा प्यायलाच नाहीये त्यामुळे चहाचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. दिवसातून फक्त २ वेळा सकाळ, संध्याकाळ. ते पण सवय आहे म्हणून. भारतात असताना रविवारी सकाळी आमच्याकडे चहाचा रतिब असायचा. सोनालीने एकदा सांगितले होते की येथे मिळणाऱ्या हाफ @ हाफ दुधाचा चहा करून प्या. एकदा प्रयोग करायचा आहे. भारतातला चहा प्यायला की एक प्रकारची तरतरी येते. इथल्या चहात ती मजा नाही.