प्रश्न १- उत्तर - क, ब, अ
प्रश्न २ - उत्तर - अ, ब, क
प्रश्न ३ - उत्तर - माझा विडंबनाचा हा प्रयत्न -
विडंबन लिहावयास जगती प्रारंभ मी मांडिला
विडंबन मनोगत पद्याचे वाटे करावे मला
कारकून, चक्रपाणि, माफी, खोडसाळ, टीकाराम
लिहिणार माझे नाव त्यांपुढे देऊन 'स्वल्पविराम'
काय करावे? काय लिहावे? विडंबन असते कसे?
माफी? कारकून कोण? सांगा, टीकाराम कोण असे?
ह्यांच्या प्रतिभेपुढती माझे विडंबन का हो फसे?
माझ्या लेखणीतून उमटति 'प्रश्नचिन्हां'चे ठसे!
टोपणनाव पुढे करोनि विडंबन ते छापिले
ती मी नव्हेच! असे म्हणोनि हात मी झटकिले
वाव्वा!! छान!! प्रतिसाद येता भूमिवरी स्वर्ग ये
केला 'अर्धविराम', वाटे टोपणनाव बदलू नये!
वाटे काव्यसृष्टी मजला बहु मोकळी मोकळी
विडंबने लिहून वाटे काढू भरून पोकळी
परि मनोगतावरी दिसती चोखंदळ हे जन
त्यावेळी मग होतसे सहजचि 'उद्गार'वाचि मन!!
शब्दकोश, व्याकरण पुस्तिका, संदर्भ ग्रंथ आणिले
ही एकेक आज समर्थ नसती, ट ला ट ही ना जुळे!
काव्यरसातळ मी असा, चिरं जेथे गाठला,
देवा, 'पूर्णविराम', त्या विडंबनास दे तू आजला!
--------- वरील ओळी वृत्तात नाहीत ह्याची जाणीव आहे. कुणी काही सुधारणा सुचवणार असल्यास स्वागतच आहे.
(काव्य-अजाण) वरदा