या कवितेत कविला हलाहल चा अर्थ 'किटकनाशकयुक्त शीतपेये' असा आणि तेवढाच आहे.
हे ठीकच! कारण नाहीतर मग
आम्ही पाजतोय ते विष
आम्हीच जन्म दिलेल्या बाळांना
अन् वर देतोय आशीर्वाद
'औक्षवंत व्हा, बाळांनो!'
'औक्षवंत व्हा' !
याला काहीच अर्थ राहत नाही.
एकतर लिंबूपाणी पिणारे स्वतःच पितात; त्यांना कोणी पाजावे लागत नाही. दुसरे म्हणजे "टू युअर हेल्थ" वगैरे सगळे ठीक आहे, पण आपल्याच बाळांना लिंबूपाणी पाजून "औक्षवंत व्हा" वगैरे म्हणताना आजतागायत तरी कोणाला पाहिलेले नाही.
(तसेही शीतपेये पाजूनसुद्धा "औक्षवंत व्हा" कोण म्हणते?)
पण नीलकंठ यात नेमका हस्तक्षेप कसा करणार? पृथ्वीला वाचवण्यासाठी एकदा हलाहल प्राशन केले, तसे टनावारी 'कोक' पिऊन??? (मग त्यातून तर 'कोक'ची जाहिरातच होईल की... खुद्द 'महादेव की पसंद' म्हणून!)
(डिस्क्लेमर: यातून हिंदू देवदेवतांचा इ.इ.)
- टग्या.