मैथिली,
अप्रतिम लिहिलं आहे तुम्ही ! वाचायला सुरूवात केली म्हणेतो भराभ्भर वाचत वाचत मी कधी 'समाप्त' शब्दाशी येऊन पोहोचले कळलं देखिल नाही. सहजसाधीसरळ तरीही गुंतवून ठेवणारी अशी आपसुक वळणे घेत जाणारी ओघवत्या लेखनशैलीत लिहिलेली कथा वाचायचा जिवंत अनुभव आला आज तुमचं हे लेखन वाचून. कथानकात खूपच तफावत असूनही विजूची आश्रमासाठीची तळमळ पाहून 'गोड गुपित'ची आठवण कधी मनात तरळून गेली कळलं नाही. तुमचं असंच आणखीनही लेखन वाचायला मला खूप आवडेल. पुढील लेखनासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा.