*एक प्रश्न विकिपीडिया हा शब्द कसा तयार झाला ?खुलासा केल्यास उपकृत होईन.
-Wikipedia(विकिपीडिया) Wiki आणि encyclopedia या दोन शब्दांची संधी आहे.Wiki हि एक encyclopedia च्या 'एंट्रीज' कुणालाही 'ऑनलाईन' 'इंटरनेट' वर करता येतील अशी संगणक प्रणाली आहे.
विकी (Wiki / wiki ) हे वापर करणार्यांना उपलब्ध माहितीत भर घालायला, तसेच त्या माहितीचा वापर करणार्यांना बदल किंवा दुरुस्त्या करण्यास मुभा देणारे ।संकेतस्थळ आहे.
विकीतील नाव नोंदणी मुळे विकीचे संपादन सुकर होते, पण बहुतेक वेळा नाव नोंदणी हि अत्यावश्यक बाब नाही.यामुळे एकत्र येउन लिखाण करण्याचे काम आणि संपर्क सुलभ रहाते.
विकी या संकेतस्थळ चे काम करणार्या संगणक प्रणालीस सुद्धा विकी असे म्हणतात.विकीचे पहिले प्रारुप "विकीविकीवेब" वॉर्ड कनिंघम यांनी इ.स.१९९५ यांनी केले. हवाई प्रदेशातील भाषेत 'विकी-विकी'चा अर्थ 'लौकर,चटकन' असा होतो.
अधिक माहिती साठी पाहा :