मी कधी लाडू करून पाहिले नाहीत. पण असे वाटते की तुमचा पाक कच्चा न राहता थोडा पक्का झाला असेल ?
रव्याचे लाडू हमखास कोरडे होतात आणि असे लाडू खाताना मजा येत नाही. रव्या-नारळाचा लाडू कसा तुकडा जिभेभर ठेवल्यावर विरघळायला हवा आणि लाडूचा भुगा ही होता कामा नये.
रव्या-नारळाच्या लाडवाला तूप भरपूर लागते. तूप कमी पडल्यासही लाडू कोरडे होतात. आणि तूप जास्त झाल्यास लाडू बसतात :-)
रोहिणीताई तुमच्या पाककृतीमुळे आता कधी एकदा रव्याचा लाडू खाते असं झालंय. आजच आईला निरोप देते लाडू करण्याबद्दल.