-- या कवितेचा 'लिंबूपाण्याशी' काहीही संबध नाही.
मीही नेमके हेच म्हणायचा प्रयत्न करतोय...
-- मला वाटल होतं की सध्याच्या शीतपेये-'कीटकनाशक-आरोग्याला धोका' -या बातम्यात असलेल्या विषयांमुळे ही कविता कोणालाही चट्कन समजेल.
माफ करा, पण मला वाटते की 'शीतपेये-कीटकनाशक-आरोग्याला धोका' हा विषय १. एक तर तितकासा नवीन नसावा, आणि २. त्यामुळे ही कविता चटकन कळते असे मला तरी वाटले नाही.
पण कुणाच्या तरी प्रतिसादामुळे माझी कविता राहिली बाजूला व चर्चा लिंबूपाण्यात बूडून गेली.
ह्या कवितेच्या वेदना व गांभीर्याकडे दुर्लक्ष होत आहे ही माझी खरी वेदना आहे.
चार लोक जमले की हे व्हायचेच. (आणि प्रामाणिकपणे माझ्यापुरतेच बोलायचे झाले, तर या कवितेच्या विषयात वेदना वाटण्याइतकेही गंभीर मला तरी काही वाटले नाही. I mean, कोक-पेप्सी वगैरे तुमच्यामाझ्या मुलांच्या घशात आपली पेये ओतायला आलेली नाहीत. तुमच्यामाझ्या मुलांना काय पिऊ द्यायचे आणि काय पिऊ द्यायचे नाही, ते अजूनपर्यंत तरी तुमच्यामाझ्या हातात आहे* - किंवा असावे! आणि नसल्यास तो तुमचामाझा दोष आहे, कोक-पेप्सीचा नव्हे. तेव्हा कोक-पेप्सी घातक आहेत असे जर कोणाला वाटत असेल [तसे वाटणे रास्त असूही शकते**] तर त्याने/तिने आपल्या मुलांना कोक-पेप्सी मुळीच पाजू नये. पण स्वतःच्याच मुलांना विष पाजून 'औक्षवंत व्हा' म्हणण्याचा प्रश्न येतो कुठे, हे कळले नाही.
तसेही, 'शीतपेये पाजूनसुद्धा "औक्षवंत व्हा" कोण म्हणते?' हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे!
अर्थात, ही माझी मते आहेत - तुम्हाला पटलीच पाहिजेत, असा आग्रह नाही.**)
- टग्या.
*या विधानाचा अर्थ 'जयंतरावांच्या मुलांना काय पिऊ द्यायचे आणि काय पिऊ द्यायचे नाही, ते अजूनपर्यंत तरी जयंतरावांच्या हातात आहे, आणि माझ्या मुलांना काय पिऊ द्यायचे आणि काय पिऊ द्यायचे नाही, ते अजूनपर्यंत तरी माझ्या हातात आहे' असा अभिप्रेत आहे. उगाच 'तुमचीमाझी मुले'चा 'जयंतरावांची आणि माझी मुले' असा भलतासलता अर्थ काढू नये!
**हल्ली अशीही वाक्ये टाकावी लागतात अधूनमधून... सरळसरळ भांडायचीही सोय राहिलेली नाही!