व्याकरण शास्त्र, संगीत शास्त्र यासारख्या "शास्त्रां"मध्ये अनेक मानवनिर्मित नियमांचा समावेश होतो, ते कालानुसार बदलू शकतात व वेगवेगळ्या जागी वेगवेगळे असू शकतात. विज्ञान किंवा सायन्समध्ये फक्त निसर्गनिर्मित किंवा (आस्तिक लोकांच्या) परमेश्वराने केलेले नियमच येतात व सर्वांना समान प्रकारे लागू होतात हा एक या दोन्ही संकल्पनांमध्ये महत्वाचा फरक आहे.
उदाहरणार्थ हिन्दू असो वा ख्रिश्चन असो दोघांनाही पदार्थविज्ञानाच्या नियमाप्रमाणे ऊष्णतेचे चटके बसतील किंवा त्यांनी उडी मारली तर ते गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार खाली येतील. हे विज्ञान आहे. देवळामध्ये जोडे काढून व डोक्यावर टोपी किंवा पागोटे घालून आणि चर्चमध्ये टोपी काढून पण बूट घालून जाणे हे शास्त्र आहे.