मी अर्थ देण्याचा प्रयत्न करतो. काही चूकलं असेल तर बिनधास्त सांगा मला आनंदच होईल.

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा
नेति नेति शब्द न ये अनुमाना
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥१॥

त्रिमूर्ती (ब्रह्मा, विष्णु, शंकर) दत्त हा त्रिगुणात्मक (सत्त्व, रज, तम) आहे. हा त्रैलोक्याचा राणा म्हणजे राजा आहे.  इतकं असुनही याचा थांग लागत नाही. सुरवर (देव), मुनी, योगी यांना समाधी, ध्यान यामार्गांनी सुद्धा याला पूर्णत्वाने जाणता येत नाही.

सबाह्य अभ्यंरी तू एक दत्त
अभाग्यासी कैसी न कळे ही मात
पराही परतली तेथे कैचा हा हेत
जन्म मरणाचा पुरलासे अंत ॥२॥

आपल्याला अंतर्बाह्य या दत्ताने व्यापून टाकलं आहे परंतु अभागी हे जाणून न घेता त्याला बाहेर शोधत असतात. याच वर्णन करायला 'परा' वाणी ही असमर्थ आहे आणि हा मोक्षदायी आहे

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान
हरपले मन झाले उन्मन
मी तू पणाची झाली बोळवण
एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान ॥४॥

दत्त दत्त असे ध्यान लागल्यावर मन 'उन्मनी' (ही योग्यांची एक अवस्था आहे)अवस्थेत जातं आणि मी, तू अशी द्वैतावस्था जाऊन अद्वैतावस्था प्राप्त होते.