देवी दैत्यी सागरमंथन पै केले, त्यामाजी अवचित हळहळ जे उठले
ते त्वा असुरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले ॥३॥

देवा दैत्यांनी जेव्हा समुद्रमंथन केलं तेव्हा प्रथम त्यातून 'हलाहल' हे विष उत्पन्न झालं. तेव्हा जगाला वाचवण्यासाठी शंकराने ते विष प्राशन केलं. त्यामुळे त्याचा कंठ निळा झाला आणि तेव्हा पासून त्याला नीलकंठ हे नाव पडलं.

वर दिलेल्या आरतीमधल्या ओळींत 'हळहळ' च्या ऐवजी 'हलाहल' हे योग्य वाटत. तसच, 'असुरपणे' च्याऐवजी 'सुरपणे' असावं  (म्हणजे अगदी देवासारखा आला आणि ते विष प्याला)

शेवटच्या चरणात 'मदनारी' म्हणजे 'मदना'चा शत्रू. शंकराने मदनाला जाळला होता. पण इतर देवांच्या आग्रहावरून (आणि सृष्टी नीट चालावी म्हणून) त्याला परत जिवंत केला. तोपर्यंत मदनाचा देह नष्ट झाला होता. त्यामुळे मदनाला पण तेव्हा पासून 'अनंग' असं नाव पडलं.