हे येणारे दूरध्वनी यावेत, तर कधि यावेत?, येऊ नयेत, तर का?

कधी यावेत ? तर घरी किंवा कचेरीत जेव्हा फार काम नसेल आणि थोडा विरंगुळा हवा असेल तेव्हा !! (ह घ्या !!)

माझे मत - असे दूरध्वनी येऊ नयेत.

आता असे दूरध्वनी येऊ नयेत यासाठी दोन उपाय आहेत. एक म्हणजे, छायाताईंनी दिलेल्या दुव्याप्रमाणे तुम्ही आपला दूरध्वनी/भ्रमणध्वनी क्रमांक "सतावू नका" यादीत समाविष्ट करणे.

आणि दुसरा उपाय - समजा असा दूरध्वनी आलाच तर, त्या "मंजूळ" आवाजाला सांगणे की, मी सध्या कामात गर्क आहे, तेव्हा मलाच तुमचा दूरध्वनी क्रमांक द्या म्हणजे कामातून मोकळा झाल्यावर मीच तुम्हाला दूरध्वनी करतो !! बघा ही युक्ती एकदा वापरून ! (मी स्वतः वापरून पाहिली नाही !)