चरागप,
अतीव सुंदर आहे तुमची ही कविता ! आणिव, नोळखु, रामछावणी, इतुक्यामद्धे या सर्व ( माझ्यासाठीतरी ) नविन शब्दांची रचना आणि योजना खूप आवडली. कवितेच्या शेवटी अधोरेखित केलेले शब्द वाचून अत्यंत आनंद झाला.. कारण कवितेतून तो प्रसंग नजरेसमोर प्रत्यक्षातच घडत असल्यासारखे वाटले !
या सुंदर अभिव्यक्तीमध्ये मदत केल्याबद्दल तुमच्या वडलांचे कौतुक वाटते.
मूळ शब्द न व्याकरणदृष्ट्या न बदलताही लिहिले तरी चालतील असे वाटते ( मला वृत्तांमधलं काही कळत नाही, पण मी कविता म्हणून पाहिली तेव्हा ही गोष्ट जाणवली म्हणून नमूद कराविशी वाटली. चु.भू.द्या.घ्या. )