आमचा एक चुलत मित्र (म्हणजे मित्राचा मित्र - त्याला कधी भेटलो नाही म्हणून मित्र उल्लेखले नाही) नेहमी गात असतो.... काय, तर जाहीराती!

सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत जाहीराती गाणार्‍या या मित्राचे जाहीरात प्रेम आमच्या मित्रमंडळात फार प्रसिद्ध झाले. त्याचे म्हणणे की जाहीरातींचा दर्जा हा हिंदी गाण्यांपेक्षा कितीतरी उच्च असतो.

मला मात्र बजाज च्या जाहीराती आवडतात. देशाभिमान व संस्कृती यांचा सुरेख संगम त्यात आढळतो.

"बुलंद भारत की बुलंद तस्वीर...."